Monday, April 2, 2007

♥ शब्द कोर्टातला ♥


न्यायाच्या न्याय मंदिरात
वकील, वकीलीचाच गळा आवळतात
शब्दांचा मांडुन बाजार
शब्दांनाच वेदना पोहचवतात

वेदनेने व्याकुळलेले हे शब्द
आपल्या अस्थीत्वाची भीख मागतात
वकील मात्र कसाईसारखे त्यांना
भर कोर्टात कचाकचा कापतात

कोर्टात शब्दाचा करुन वापर
वकील शब्दालाच हरवतात
ख-या शब्दाला देऊन शिक्षा
शेवटी फ़ासावर लटकवतात

शब्दाच्या या महायुद्धात
गीतेला सुद्धा बदनाम करतात
घेऊन खोट्या शपथा मग
देवाला सुद्धा लाजवतात

खोटे शब्द ख-या शब्दाची
सर्रास लचके मोडतात
ख-या शब्दाच्या तव्यावर मग
खोट्या शब्दची पोळी भाजतात.

शब्दाची महती जाननारे
आता सर्व ईतिहासात जमा झाले
तुम्हा आम्हा सर्वासाठी
एक प्रेरना देऊन गेले

व्यापारी या दुणियेत
शब्दांना जागा नसते
येथे शब्दाचे महत्वही फ़क्त
पैशापुरतेच असते

- ♥अमोल कोष्टी♥

1 comment: