Monday, April 2, 2007

♥ आता नेहमीचचं झालयं ♥


तुझी आठवण रोज करता करता
ह्रुदयाचे ठोके अचानक वाढनं
आता नेहमीचचं झालयं

तुझ्या सोबतीचे ते क्षण आठवतांना
वेळेचं भानच न राहनं
आता नेहमीचचं झालयं

वाटेत तुझ्यासारखा चेहरा पहिल्यावर
तु समजुन जोरात हाक मारनं
आता नेहमीचचं झालयं

घरात तुझा विषय निघाल्यावर
डोळ्यात हळुच अश्रु येनं
आता नेहमीचचं झालयं

तु सोबत नसलास तरी
रोज रोज तुझी जाणीव होनं
आता नेहमीचचं झालयं

तुझ्यासोबत आनंदी जगल्यानंतर
तुझ्यावीना रोज रोज मरणं
आता नेहमीचचं झालयं

तु येशील कधीतरी अशी आस मनाशी धरुन
तुझी वाट फुलांनी सजवनं
आता नेहमीचचं झालयं
- ♥अमोल कोष्टी♥

1 comments:

mazya kavita said...

wow! khup chan kavita ahe. khup chan lhil ahes..
chan lihitos.. pan ,

lihin matra nehmich ka nahi zale??